Thursday, March 17, 2016

प्रतापगड मशाल महोत्सव

सस्नेह जय शिवराय                                                                               नितेश पाटील  ९६३७१३८०३१
प्रतापगड मशाल महोत्सव २०१५                                                                   १६/१७ .१०.२०१५
सस्नेह जय शिवराय
प्रतापगड मशालमहोत्सव शुक्रवार दि.१६.१०.१५
मंत्रमुग्ध करणारा देदिप्यमान सोहळा……

खरं सांगायच तर श्री छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने, त्यांच्या वास्तव्याने, त्यांच्या पराक्रमाणे पावन झालेल्या गड किल्ल्यांवर फिरणे हे कुठल्याही तिर्थक्षेत्रापेक्षा माझ्यासाठी जास्तच .त्याच्या सानिध्यात गेल्यावर जर महाराजांचा ईतिहास तुम्हाला माहीत असेल ( नसेल तर महाराष्ट्रात जगणं सोडुन द्यावं ) तर अंगावर रोमांच( हातावरचा केस न केस त्या परमेश्वरास नमन करण्यासाठी ऊभा राहतो ) उभं राहील्या शिवाय राहणार नाही.महाराजांचा ईतिहास, त्यांचं शौर्य, त्यांचे पराक्रम, त्यांच शासन… त्यांच्यासाठी, स्वराज्यासाठी वेळी मरणास तत्पर असणारे निस्वार्थी एकनिष्ठ १००स१ असे या मातीशी प्रामाणिक असणारे कैक मावळे, त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य , हे स्वराज्य व्हावे हि त्या काळी श्री ची ईच्छा होती. आणि त्यासाठी आपले सर्वस्व स्वराज्यासाठी अर्पण करणारा मंत्रमुग्ध होणारा समाज होता.आताही असेल पण फरक आहे आता श्रीला जान्हवीच्या मागे लावलयं.ते पाहण्यात समाज ईतका गुंग झालाय कि श्री ला ही काहिहि म्हणु लागले.समाज ईतका अधोगतीला का चालला हे कदाचीत मला सांगता येणार नाही .सण सोहळ्यांची दुर्दशा करुन टाकली.त्याला अपवाद असतात हे पारंपारीक, सांस्कृतीक,देदिप्यमान सोहळे.

  1. आज मीच लीहलेल्या काही ओळी ईथे नमुद करु ईच्छीतो

सण सोहळे

गाव एक अन् ऊत्सव अणेक
सण सोहळ्यांची का झाली दशा
कोणी केली त्यांची दुर्दशा...
प्रतिष्ठा मिरवणारी पिढी
राजकारण करणारी समाजप्रवृत्ती
असेल काही प्रमाणात मी ही...
सण म्हणजे करमणुक नाही
सण म्हणजे खेळ नाही
तुझा मोठा की माझा मोठा
तो काही घर बंगला नाही
आपापसात तु झगडत राहिला
चंगळवादि समाज वाढू लागला
का विसरला माणूस सणांचा
शुद्ध, सात्विक हेतू , मतितार्थ...
सज्जन समाज शोकात राहीला
दुर्जन समाज जोमात वाढला
जाण ती संस्कृतीची का धरु नये
स्पर्धेपायी पिढी ऊगा नासवू नये
अमुल्य अपुल्या सण, ऊत्सव, परंपरा 
अनादिकाळची प्रथा नासवू नये....
.............नितेश पाटील २९.९.१५
असो माझं हे असं होतं आपण कुठं होतो…..?
प्रतापगडाचा संक्षिप्त ईतिहास ……
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम झाले.निरा आणि कोयना नद्यांचे संरक्षण हा यामागचा मुख्य उद्देश होता .इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात प्रतापगडाचे युध्द झाले. अफझलखान वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्‍या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला.इ.स.१६५९ ते इ.स.१८१८ या प्रदीर्घ कालावधीत इ.स.१६८९ मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही.


प्रतापगडावरील भवानीमातेच्या मंदिराला ३५५ वर्षे पूर्ण झाली. प्रतापगड वासिनी जगदंबा आई भवानी मातेच्या मंदिराला ३५० वर्षे झाल्यापासून हा कार्यक्रम नवरात्रीमधील चतुर्थीला साजरा केला जातो. यंदा पहिली माळ दोन वेळेस आल्यामुळे हा कार्यक्रम अश्वीन शुद्ध तृतीयेस मोठ्या ऊत्साहात , जल्लोशात,पारंपारीक ,सांस्कृतीक पध्दतीने पार पडला. गत वर्षीप्रमाणे यंदाही आम्हास मशाल प्रज्वलीत करण्याचा सहभाग मिळाला.धन्य जाहलो…यंदा आम्हा पालघर धनसारकरांची ऊपस्तीथी ऊल्लेखनियच होती.गतवर्षी दहा जण,त्याच्या आधी  पाच जण आणि यंदा तब्बल साठ जण…ज्या वर्षी पहील्यांदा पाच जण गेले होते त्यात सुदेश, जीतु आणि त्यांचे मित्र पण त्यांच अहोभाग्य म्हणजे महाराजांचा ईतीहास ज्यांनी जीवंत केला घराघरात, प्रत्येकाच्या ह्रुदयात वसवला ते महान व्यक्तीमत्व गडावर उपस्थीत होते...मी काय वर्णू त्यांना तो माझा घास नाही. आत्ताच त्यांना महाराष्ट्रभुषन म्हणुन सन्मानीत करण्यात आलं त्यानिमीत्ताने काही ओळी लीहल्या होत्या...

महाराष्ट्र भूषण " शिवचरित्राचे अभ्यासक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (बळवंत मोरेश्वर पुरंदरे)

मी काय वर्णावे त्यांसी साहित्यिकांचा सन्मान पुरंदरे
शिवनेरीच्या शिवरायांनी झपाटले ते पुरंदरे
भक्तिमार्गावर ज्ञानदीपचा प्रकाश  ते पुरंदरे
ह्या युगात उदात्त वेडाने झपाटलेले ते पुरंदरे
इतिहासातुन राष्ट्राचे शील शोधले ते पुरंदरे
शिवचरित्र एकमेव जीवितधेय्य साकारले ते पुरंदरे
शिवचरित्र लिहताना अखंड सावधान ते पुरंदरे
भूतकाळाचा अर्थ समजून इतिहास सांगणारे ते पुरंदरे
अंतकरणात कवी मोहरबंध गोंडेदार ते पुरंदरे
इतिहास संशोधन हे शास्त्र त्यांसी ते पुरंदरे
अंगाअंगावर रोमांच स्थापित करावे ते पुरंदरे
शिवसाक्ष पत्रासाठी प्रलयपाउस सहनारे ते पुरंदरे
भाषेच्या अंगातून अलगद ओसंडून जाणारे ते पुरंदरे
तपशीलांवर पकड़ ती भलतीच कडक ते पुरंदरे
शिवचरित्र आठवित पावले शोधत फिरले ते पुरंदरे
कालवस्त्रा दूर सारुन इतिहास दर्शन घडवणारे पुरंदरे
दिले आयुष्य मिळवले शिवचरित्र धन ते पुरंदरे
लोकशाहिला अत्यंत पोषक भूमिका देणारे पुरंदरे
किती निराशा,किती अपमान तरी न डगमगले ते पुरंदरे
अखेर महाराष्ट्र भूषण म्हणून सन्मानित झाले ते बाबासाहेब पुरंदरे... 
नतमस्तक मी तया चरणी उदात्त उदार ते पुरंदरे 

… नितेश पटील २०.८.१५

समाज निच्छीतच जागृत असतो. कुणालातरी पुढाकार घ्यावा लागतो. पण तो पुठाकार घेत असताना मी पणाची जाणीव त्याच्या ह्रुदयात वास करता कामा नये. ती नव्हती अन् कधी राहणारही नाही जो महाराजांचा होईल तो तो जणतेचा निच्छितच होईल यात तिळमात्र शंका नाही. ते बिजच ईतकं कर्मप्रधान आहे की ते कुठेही उगवल्याशिवाय राहू शकत नाही. जे काही आहे ते आपलं तुम्हा आम्हा सर्वांच आहे. महाराजांचे गुणगाण आज सर्वच गातात पण त्यांचा आदर्श मात्र कुणी घेत नाहीत(८०%). हिच खरी शोकांतीका आहे. आमच्या बरोबर शिवप्रेमी येण्याच कारण म्हणजे महाराजांप्रती असलेली आस्था,प्रेम…आणि हो आमच्यात मी कोण असा कुणीच नाही खरतर हे सागांयची गरजच नाहीये. सारेच शिवप्रेमी महिला, पुरुष, युवक, युवती, त्याच बरोबर रीदान, श्लोक, आर्या,जीया हि तर पाच वर्षा आतील चिल्ली पिल्ली पण पुढची पिढी.....ते घडवन्याचं कार्य तुम्हा आम्हा सर्वानाच करणे आहे शेवटी ती तुमचं अणुकरण करुनच घडत असतात. जे पेराल तेच उगवत असतं... जीजाऊंनी शिवराय घडवले ते कलर टिव्ही पाहून नाही. माफ करा पण पुर्वि बाई गरोदर असताना शुरांची चरीत्र,ग्रंथ,वांगमय वाचीत होत्या. मुलांनवर संस्कार हे जीतके समाजात घडत असतात त्याच्याहुन अधीक आईच्या उदरात घडत असतात हे माझं ठाम मत आहे नव्हे तो माझा अनुभव आहे...आता बाईला टिव्ही सुटत नाही.आणि त्यात बाहेरच्या समाजात तमोगुणी, चंगळवादि माणसांची संख्या वाढली परीणामी प्रोडक्शन खराब.कुठल्याही समुहाबरोबर पहिल्यांदाच जात असाल आणि परतेपर्यंत जर अलीप्त राहत असाल तर कुठेतरी मी या शब्दाने जन्म घेतलाय हे निच्छित.. त्याचं तुम्हाला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.कसं आहे ना आंब्याच झाड सर्वाणांच माहीत आहे त्याला मोहोर येतो बहर येतो आंबे येतात सारं काही मजेत चाललेल असतं अचानक काही दिवसांनी त्या झाडावर दुसरं एक झाड दिसू लागतं. ते हि सुंदर साजेसं.त्यालाही फळं येतात ती आपण खातो.लहान जरी असली तीतकीच मधुर असतात ती.पण हळु हळु ते झाडावर आलेलं, मातीशी न जुळलेलं झाड आपलं वर्चस्व प्रस्तापीत करतं आणि पाहता पाहता आंब्याच्या झाडाच रुपांतर एका वेगळ्याच झाडात झालेलं असतं.कालांतराने त्याची मुळं जमीनीत नसल्या कारणाने तेही उद्वस्त होतं.तो स्वत्ःही शेष झाला आणि आंब्यालाही शेष केलं.आमच्या ईथे त्या झाडाला बटांगली अश्या नावाने संबोधतात. तात्पर्य काय तर कुणिही आपल्यावर वर्षस्व करता कामा नये परीणामी आपणही जाणार अन् तोही तुम्ही कृतज्ञशील असावं पण समेरचा निष्ठावान असेल तर ….महाराजांपाशी निष्ठावंत माणसं होती त्याला महत्वाचं कारण म्हणजे महाराज कृतज्ञशील होते,स्वतःसाठी ते जगलेच नाहीत जे काही ते सारं स्वराज्यासाठी… ईतिहास नव्याने सांगायची गरज नाही…..

आम्ही सारेजण संध्याकाळी ५.३० ला पायथ्याशी वाडा कुंभरोशी गावात विश्रांतीगृहापाशी पोहचलो. आनंद दादा (नेकदिल महाराजांचा निष्ठावंत मावळा) हि खाली आले होते. त्याचं वास्तव्य गडावरच असतं… त्यानी कार्यक्रमाची पुनःचा रुपरेषा सांगीतली नी आम्ही फ्रेश होउन ६च्या आसपास किल्ले प्रतापगडावर पोहचलो किल्ले प्रतापगडावर ३५५ मशाली तटबंदीला लावून त्या सज्ज झाल्या होत्या. आम्हीही शिवप्रताप बुरुजावर आकाशात नृत्य करण्यासाठी,अताषबाजी करण्यासाठी फटाके घेउन आलोच होतो.तत्पुर्वी सारेजण लगबगीने अंधार होण्याच्या

आधी छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा पाहण्यासाठी थेट वर केदारेश्वर मंदिराच्या ऊजव्या बाजुस असणार्या हिरव्या उद्यानात गेलो.तो पर्यंत सुर्य ही अस्ताला गेला होता.महाराजांचा पुतळा पाहून परत पायर्‍यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे कूच केली मंदिरात प्रवेश करताच आपल्याला भवानीमातेची सालंक्रुत प्रसन्न मूर्ती दिसते. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली आहे या मूर्ती शेजारीच महराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव
मोहिते यांची तलवार ही दृष्टिस पडते.त्या मंदिराचा कळस आजही सव्वा किलो सोन्यानी त्याच थाटात नटलेला आहे. दर्शन घेऊन आम्हास जीतू आणि सुदेशने आप्पांची ओळख करुन दिली. प्रतापगडावरील सोहळा त्यांच्या देखरेखे खालीच होतो
नेहमी प्रमाणे प्रतापगड स्वराज्य ढोलपथक मंदिराबाहेरील प्रांगणात सुर धरु लागला.तुतारी,ढोल
ताशांचा आवाज गगणाला भिडू लागला.अंगा अंगात रोमांच प्रस्थापीत होऊ लागलं…!! चैतन्य ऊसळू लागलं…!!
खासे पंचवीस मावळे पायरयांच्या दुतर्फा उभे राहून मशाली पेटवल्या गेल्या. त्यात आम्हिच १६ जण होतो हि आमच्यासाठी भाग्याची गोष्ट
होती.पेटत्या माशाली घेऊन आम्ही शिवप्रताप बुरुजाकडे धावले. सुरवातीला तोफेच्या गगणभेदि आवाजाने अवघा प्रतापगड परीसर दुमदुमून गेला ढोल ताशांनीही त्या अविस्मरणीय क्षणाचा साक्षी होण्यासाठी सर्वोच्च शिखर गाठलं . शिवप्रताप बुरुज ते भवानीमाता मंदिर या संपूर्ण तटबंदीला मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. सुरुवातीला त्यानंतर
“जय भवानी जय शिवराय”…..!!
“हर हर महादेव”….!!
” प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक , कीर्तिवंत, बुद्धिवंत, महाराजाधिराज, हिंदूपदपादशाह श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय “….!!!
या जयघोषाने गडकोट आसमंत दणाणून गेला. शिवप्रताप बुरजावरून यंदा प्रथमच भव्य प्रमाणात फटाक्याची अताषबाजीने आसमंती अग्णि नृत्य गजबजु लागलं.खाली खानाच्या कबरेतील मातीलाही घाम फुटावा असा देदिप्यमान सोहळा साजरा होत असताना फक्त साक्षीदारच नव्हे तर मशाल प्रज्वलीत करण्याचे अताषबाजी करणयाचे आम्हास भाग्य मिळाले.पुण्हा वर येउन अंगातील शिवसंचार ठोल ताशाच्या गजरात थीरकण्यास प्रोत्साहीत करत होता…
तदनंतर वेळ होती प्रसाद वाटण्याची. आई भवानीचा प्रसाद ( जेवण ) प्रत्येक भक्तापर्यंत आवडीनं गोडीनं पोहचवण्याच काम आम्हीही आवडीने करत होतो.शिवभक्ताचा उत्साह प्रत्येकाच्या चेहर्यावरुन ओसंडून वाहत होता.गतवर्षीपेक्षा यंदा शिवभक्तांची संख्या बरयाच प्रमाणात वाढली होती.पुढेही वाढत राहील शंका नाही…ज्याने एकदा का सोहळा पाहिला तर त्याला पुन्हा त्याचा मोह आवरता येणार नाही हे निच्छित….गर्दि जशी ओसरु लागली तसा आम्हीही प्रसाद भक्षण करण्यास मंदिराच्या प्रांगणात जेवण घेउन बसलो. जीतु,अमोल,सुदेश,अंकुरआणि मी…बाकीच्यांच आधीच आटोपलं होतं आमचं संपेस्तोवर आनंद दादाही येउन आमच्यापाशी जेवणासाठी बसले…
आई भवानीची महाआरती नंतर गोंधळाला सुरवात होणार होती.तत्पुर्वी सांगली येथील कलाकारांनी हलगी वाद्याचे सादरीकरण केले.
एक नवीनच कला पाहण्यास मीळाली त्यानंतर छोटेखानी सत्कार समारंभ पार पडला.त्यात ईतर
शिवप्रेमींबरोबर स्वास्तिक आणि धनसारकर समुहानी नवरात्रउत्सवात केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता चिन्ह देण्यात आलं ते सर्वांच्या वतीने जीतुने स्विकारलं.आपण काहीही समाजासाठी केल्याची समाजाकडून पावती मीळत असते.त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय स्वराज्याच्या प्रतापगडावरुन आला.असो…आपण आपलच कौतुक करणे म्हणजे अधोगतीला जाणं हा माझा सिधांत्त अाहे
गोंधळाला सुरवात झाली आणि पुन्हा अंगात एक वेगळच चैतन्य सळसळू लागलं..हे अनुभवावं लागतं …त्याचं शब्दात वर्णन मला जमतय की नाही ते ही मी सांगु शकत नाही..पण एका वेगळ्याच विश्वात आपण दंग झालेलो असतो.शिवकालीन जगाचा आभास कुठेतरी हावी झालेला असतो.आई अंबेचा गोंधळ हातात पेटत्या मशाली…मंत्रमुग्ध झालेला आई भवाणीचा प्रांगण.त्या प्रांगणात शिवप्रेमींची ओसंडून वाहणारी गर्दि…संबळाच्या ताळावर फीरकणारे पाय, आधुनीक युगाची जोड म्हणाल तर तो क्षण टिपण्यासाठी डोकावणारया मोबाईलरुपी नजरा….त्याचाही मनसोक्त आस्वाद घेउन परतीचा मार्ग धरला सकाळी महाबळेश्वरच्या निसर्गसानिध्यात जाण्याचे ठरले होते…पाय परतीच्या दिशेने निघन्यास ऊत्सुक नव्हते पण पर्याय नव्हता.
अशीच कृपा आम्हावर सदैव रहावी हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना….
शब्दात वर्णन करणं अशक्यच…खरं म्हणायचं झालं तर मला शब्द अपुरे पडतायेत किव्हा सुचत नाहीयेत म्हणा…
जगदंब……
जय शिवराय …..
..........नितेश पाटील
nitesh715@gmail.com
०९६३७१३८०३१

No comments:

देवरूपा ट्रेक

ट्रेक देवरूपा हिमालय महात्म्यांचा सहवास मोठा दिव्य प्रत्यय घेऊया उंचावरती घर हिमाचे जाऊन तेथे पाहूया फुलझाडांच्या दऱ्यांमधून बहरलेल्...