Thursday, July 6, 2017

रंधा फॉल भंडारदरा

सस्नेह जय शिवराय मित्रहो...
____अकोले तालुक्यात भटकंती केलेली नाही असे नाही. त्या निसर्गरम्य वातावरणात रतनगड, हरिश्चंद्रगड, भंडारदरा, कळसुबाई अशा तारुण्यमय निसर्गात रानवाटांची सलगी करून, पायपीट करून त्या सौंदर्याचा आस्वाद माझ्या परीने मित्रपरिवरासोबत मी प्रत्यक्ष घेतला आहे. पण काल जेव्हा रुचित इलेक्ट्रॉनिक्स (आल्याळी, पालघर) मधून पिकनिक म्हणून भंडारदरा परिसरच्या सानिध्यात पुन्हा गेलो तेव्हा पूर्वी वेळेअभावी सुटलेली काही स्थळे पाहून, यापुढे या भागात आलो तर ती कधीच सुटणार नाहीत हे मात्र निश्चित झाले.

____ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका. या तालुक्याचं नाव जरी घेतलं, तरी निसर्ग सौंदर्याची अमाप कृपा या तालुक्यावर आहे हे सांगायची गरज भासत नाही. हा तालुका म्हणजे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. डोंगरकडे, जलाशय, हिरवी वनराई, पावसाळ्यात जागोजागी अनेक वैविधतेने नटलेले धबधबे, ब्रिटिशकालीन भंडारदरा धरण, मग त्यास विल्सन डॅम म्हणा, आर्थर लेक म्हणा... अनेक सुळके, कातळकडे, प्राचीन मंदिरे, गड किल्ले, मग रतनगड, मदनगड, कुलंग, आजोबा, बितनगड, पाबर गड, हरिश्चंद्रगड असे किल्ले असोत की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई असो...  सारेच इथल्या सौंदर्यात भर टाकत असतात. रतनवाडीतील झांझ राजानी बांधलेले हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे अमृतेश्वर मंदिरही आकर्षक आहे.

____रतनगडाच्या गाभाऱ्यात वर इतक्या उंचीवर असलेल्या अंधार कोठीत असलेले स्वच्छ, शीतल पाण्याचे टाके, (यातले पाणि मी पिले आहे, अमृतातुल्यच) आणि अगदी त्याच्या विरुद्ध दिशेने मागच्या बाजूने झालेला प्रवरेचा उगम. त्यातून वाहणारे अमृततुल्य पाणी निसर्गाची शोभा वाढवत पुढे जात असते. भंडारदरा धरणातून पुढे जात प्रवरासंगम येथे ती गोदावरीस मिळते. शेंडी गावातील भंडारदरा धारणापासून अवघ्या आठ ते दहा किमी अंतरावर रंधा या गावात जवळजवळ दीडशे ते एकशे साठ फूट दरीत खाली झेपावते. आणि जन्म होतो एक अभूतपूर्व, अद्भुत अश्या धबधब्याचा. हे प्रेक्षणीय स्थळ पावसाळ्यात ऑगस्ट, सप्टेंबर महिण्यात पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते. अगदी त्याच्याच बाजूला उजव्या हातावर रानदहून येणारा पाण्याचा प्रवाह तितक्याच खोल दरीत हर्षोउल्हासने खाली झेपावत असतो.

____ते रौद्र पण लोभसवाणी दृश्य नजरेत साठवण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची आवाजाही आपणास पहावयास मिळते. या दोहोंच्या मध्ये घोरपडा देवीचे सुरेख मंदिरही आहे. पर्यटकांना वेगवेगळ्या कलेने पाहण्यासाठी परिसरात बरसचे पूल रस्ते बांधलेले आहेत. त्यावरून आपण त्या रौद्र पण अद्भुत निसर्ग अविष्काराचा आस्वाद घेऊ शकतो. बऱ्याच फ्लिम डायरेक्टरांनाही या जागेचा मोह आवरता आला नाही.  अनेक गाजलेल्या चित्रपटातील दृश्ये इथे चित्रित झालेली आहेत. अकोल्यातील रंधा गावी रंधा फॉलच्या माध्यमातून निसर्गाने आपल्यासाठी एक आकर्षक केंद्रबिंदू स्थापित करून ठेवलेला आहे. जर गेला नसाल तर या पावसाळ्यात त्याचा परमानंद जरूर घ्या.

नगर जिल्हा त्यात तालुका अकोले
साज चढला पाहून मनास भावले

दिसे रम्य पावसाळी दृश्य मनोरम
या येथे, काय करता घरात मोघम

रूप खुलते सौंदर्य येथे कणाकणाला
पावसाळा साज चढवितो निसर्गाला

गडकिल्ले, कातळकडे त्याच्या ठायी
उंच शिखर शोभून दिसे कळसुबाई

आळविण्या रोज येतो मेघ त्याच्या दारी
गुज मनाचे घेऊन येति मग सरींवर सरी

घोंगावत येथे येई बघ धुंद गार रानवारा
पाण्यावरती पाणि नाचते मांडून पसारा

सळसळते तारुण्य येथे जणू आविष्कार
रतनगडाच्या कुशीतून निपजे प्रवरेची धार

अवखळ अवघड वाट काढत येते रतनवाडी
अमृतेश्वर मंदिर बांधे झांझ प्रवरेच्या काठी

झऱ्या धारेतून भरून जाई धरण भंडारदरा

घोंगावतो येथे धुंद रानवारा
किती शोभे धरण भंडारदरा

भंडारद-यापासून उत्तरेस १० कि.मी.अंतरावर प्रवरा नदी ५० मीटर खोल दरीत झेपावते. त्या ठिकाणास रंधा धबधबा असे म्हणतात. येथे घोरपडा देवीचे मंदिर आहे. रंधा धबधबा म्हणजे सळसळत्या तारुण्याचा आविष्कारच. रतनगडाच्या कुशीत जन्म घेतलेली प्रवरा नदी डोंगर रांगातून स्वच्छंद वळणे घेत २०कि.मी.च्या प्रवासानंतर अचानक 5० मीटर खोल दरीत झेपावते. त्यावेळी त्या ठिकाणी पाण्याचा हा रौद्र मंगल कल्लोळ, पाण्याचा तो शुभ्र धवल झोत, तुषारांचे वैभव अन त्या तुषारांवर उमटलेले इंद्रधनू, तेथील निरव शांततेला भेदणारा प्रपाताचा आवाज या सर्वांच्या संगमातून वेगळेच संगीतमय वातावरण निर्माण होते.
भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे.येथे भंडारदरा धरण आहे. या गावाजवळ जलविद्युत केंद्र आहे. भौगोलिक अक्षांश- १९० ३१’ ४” उत्तर; रेखांश ७३० ४’ ५”पूर्व.

भंडारदरा (शेंडी) हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले एक आदिवासी कोळी महादेव जमातीचे गाव आहे. ते निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.

भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.

भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. भंडारदरा धरणाचे मूळ नाव नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते. हे प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडावर झालेला आहे. प्रवरा नदीचे पाणी हे अमृतासमान असून म्हणून नदीला "अमृतवाहिनी" असे म्हटले जाते.

पावसाळ्यात तर रंधा धबधबा आणखीनच रौद्र रूप धारण करतो. पण त्याचवेळी त्याठिकाणी धोकादायक परिस्थिती पण निर्माण झालेली असते. पावसाळ्यात रंधा धबधब्याला लागुनच दुस-या बाजूला कातळापूरचा धबधबा पण प्रेक्षणीय असतो. बॉलीवूड मधील अनेक चित्रपट दिग्दर्शकही रंधा धबधब्याच्या प्रेमात पडले. त्यामुळे 'मैने प्यार किया', 'प्रेम', 'कुर्बान', 'राजू चाचा' इतर अनेक गाजलेल्या चित्रपटांतील थरारक दृश्ये येथे चित्रित झालेली आहेत.

शेंडी या गावापासून १० किलोमीटर अंतरावर रंधा या गावात एक विशाल धबधबा असून तो गावाच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या हा धबधबा त्यावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच पहायला मिळतो. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो. पावसाळ्यात मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजुने अजुन एक धबधबा पहायला मिळतो. दोन्ही धबधबे पुर्ण क्षमतेने वाहत असताना पाहणे हा एक रोमांचित करणारा अनुभव आहे.

भंडारदरा येथून उजव्या हाताला, उत्तरेस साधारण १०-११ कि.मी.अंतरावर प्रवरा नदी चे पाणी १६४ फूट खोल (खाली) दरीत कोसळते, ते ठिकाण म्हणजे रंधा धबधबा होय. येथे नदीक जवळ घोरपडा देवीचे मंदिर आहे. रंधा धबधबा पाहणे म्हणजे नेत्रसुख आहे, जितके पाहु तितके कमी असे हे विशाल पात्र आहे, निसर्ग किती सुंदर आहे याचा उत्तम नमुना म्हणजे हा धबधबा होय. येथे पर्यटकांसाठी खास सुशोभीकरण करणे सुरु आहे छोटे ब्रिज खास पर्यटकांसाठी बांधले आहे व ते सर्व सिमेंट चा वापर करून बनवले आहेत परुंतु ते पाहताना जणू काही ते लाकडांचा वापर करून बनवले आहे असेच वाटते इतके छान व सुंदर बनवले आहे. जो कोणी कंत्राटदार आहे त्याला सलाम इतके सुंदर काम करत आहेत. त्यासाठी भारत सरकार चे सुद्धा विशेष आभार.

रतनगडावरून उगम झालेली हि प्रवरा नदी, डोंगर दऱ्या पार करत छोटी मोठी वळणे घेत साधारण २० कि.मी.करून अचानक १६४ फुट (५० मीटर) खोल दरीत कोसळते. त्यावेळी त्या ठिकाणी पाण्याचा होणारा आवाज, पाण्याचा तो शुभ्र धवल रंगाचा झोत, ते निसर्गाचे वैभव यामुळे एक अप्रतिम असे संगीतमय वातावरण अनुभवता येते हा अनुभव अगदी विलक्षण आहे. .

नितेश पाटील
९६३७१३८०३१

देवरूपा ट्रेक

ट्रेक देवरूपा हिमालय महात्म्यांचा सहवास मोठा दिव्य प्रत्यय घेऊया उंचावरती घर हिमाचे जाऊन तेथे पाहूया फुलझाडांच्या दऱ्यांमधून बहरलेल्...