Saturday, June 4, 2016

किल्ले शिरगाव मशालमहोत्सव

सस्नेह जय शिवराय                                                                       नितेश पाटील ९६३७१३८०३१
                                                                                                      nitesh715@gmail.com 
      २६ मार्चची दुपार जराशी लगबगच.  ३.५५ ची लोकल पकडायची ठरवलं होतं. तत्पूर्वी बरीचशी कामं उरकायची घाई. आधीच गुडीपाडवा शोभयात्रेत होणाऱ्या कार्यक्रमाचा रोज सायंकाळी सराव चालत असे. आणि आज शिवरायांचा जन्मदिवस. शिवजयंती निमित्त सर्वच ठिकाणी विविध कार्यक्रम. त्यातच शिरगाव किल्ल्यावर पहिल्यांदाच शिवजयंतीनिमित्त मशाल मशालमहोत्सवाचं आयोजन ग्रामस्थ धनसार आणि शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी ६.०० वाजता साजरा करण्यात येणार होता. प्रस्थान जरी बँकॉक च्या दिशेनं असलं तरी चित्त मात्र गावातील सोहळ्याकडे लागलं होतं.
       शिवजयंती निम्मित किल्ले शिरगाव वर होणाऱ्या मशाळमहोत्सवासाठी थेट प्रतापगडावरची आई भवानीच्या नवरात्र उत्सवात गडावर हुकूमत करणाऱ्या मशाली येऊन सज्ज झाल्या होत्या. एकंदरीतच आई भवानीचा आशीर्वाद पाठीशी होता नव्हे तो चालून आला होता. आदल्या दिवशीच जय्यत तयारी चालू होती. शिवप्रेमी ढोल पथक धनसार पूर्वतयारीत तल्लीन होते. कारण कार्यक्रमाची सुरवात आणि सांगता शिवप्रेमी ढोलपथकानेच होणार होती. आम्ही काहीजण आदल्या दिवशी पूर्वसंध्येला पाहणी करण्यास गडावर गेलो होतो. मनात रुखरुख लागली होती ती कार्यक्रमास उपस्थित राहता येणार नाही याची.
         नाईलाजच म्हणावा लागेल पण पर्याय नव्हता. पालघराहून ३.५५ ची लोकल पकडली आणि मार्गस्थ झालो. गावात आणि किल्ल्यावरचे शिवजयंती उत्सवाचे दृश्य नजरेस स्पष्ट दिसत होते. सूर्य अंधाराच्या कुशीत जाण्यास सज्ज होता. एव्हाना आम्ही अंधेरी सोडून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील पश्चिम द्रुतगती मार्गालगत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करून डावीकडून परिसरात आत प्रवेश केला होता.
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पश्‍चिम द्रुतगती मार्गालगत उभारण्यात आलेली किल्ल्याची भव्य प्रतिकृती - See more at: http://www.saamana.com/mainpage/mumbaichya-vimantalavar-avtarli-shivshahi#sthash.KN9aeLKC.dpuf
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पश्‍चिम द्रुतगती मार्गालगत उभारण्यात आलेली किल्ल्याची भव्य प्रतिकृती - See more at: http://www.saamana.com/mainpage/mumbaichya-vimantalavar-avtarli-shivshahi#sthash.ZAdArWls.dpufछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशदारापाशी सुसज्ज असलेल्या भव्य शिवरायांच्या पुतळ्यास वंदन करून आत प्रवेश केला होता. येथील शिवरायांचे दालन हि झेंडूंच्या फुलांनी सुशोभित होते. सूर्यनारायण शिवरायांना मुजरा करून मावळतीला निघाला होता.
          वेळेआधीच आम्ही तासभर असताना विमानतळावर प्रवेशलो होतो, मावळत्या सूर्यकिरणांनी आकाशात भगवी रंगछटा पसरली होती. वाहनांची आणि माणसांची रेलचेल अखंडित चालू होती. आवारातील सुशोभित, स्वच्छ बागेत धवल कारंजाची जीभ उंच-उंच झेपावण्याचा... पुन्हा-पुन्हा प्रयत्न करत होती. आकाशात उंच सांज हवेत स्वछंद डौलात फडकनारा राष्ट्रध्वज, वाऱ्याला आपली दिशा दाखवत होता. कॉफीच्या गंधाने सभोवताल मादक बनला होता...वाफाळता कॉफीचा कप घेऊन त्या मनमोहक संध्याकाळी खुर्चीवर बसलो होतो. मात्र माझं लक्ष फिरून फिरून मशाल महोत्सवाकडे जात होतं.
             धनसार गावातील आई भवानीचं मंदिर. सायंकाळी सहाची संचारलेली वेळ. ठरल्याप्रमाणे सारेच शिवप्रेमी आई भवानीच्या मंदिरात हजर होते. पारंपरिक पोशाखात, भगवे शेले, आणि पेठे परिधान करून सारेच सज्ज होते. शिवप्रेमी धनसार ढोलपथकानी आई भवानीस मानवंदना दिली. मंदिरात मशाल प्रज्वलित करून ती किल्ले शिरगावाच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. वाटेत गावातील शिवरायांच्या अर्धपुतळ्यास मानवंदना दिली गेली. सारा आसमंत दणाणून गेला. ढोलपथकाचा उत्साह, जोश ओसंडून वाहत होता. त्या उत्सहाने सारं वातावरण भारून टाकलं होतं.. घोळक्याने माणसं जमा होत होती... त्या चैतन्यमय वातावरणातच आगेकूच करण्यात आली.
          मशाल सात वाजता शिरगावाच्या वेशीवर पोहचली. ढोलपथक पुन्हा सुसज्ज झाले. माणसांची गर्दी वाढू लागली होती. प्रथमच किल्ले शिरगाव भुईकोट किल्ल्यावर ग्रामस्थ शिरगाव आणि धनसार यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडत होता. गेल्या अवघ्या काही दिवसांपूर्वीच हा सोहळा दोन्ही गावातील नवयुवकांनी साकार करण्याचे स्वप्न पाहून तो आज प्रत्यक्षात साकार होत होता. मशाल मिरवणूक धनसार भवानी मंदिरापासून शिरगाव किल्ल्याच्या अवघ्या काही अंतरावर येऊन ठेपली होती. सुशोभित पालखीत महाराजांचा मूर्ती विराजमान होती. हाती भगवे ध्वज लहरत होते. होणाऱ्या मशालमहोत्सवासाठी
शिवप्रेमी धनसार ढोलपथकाने उपस्थितांची मने जिंकली. सूर्य अंधाराच्या कुशीत निद्रिस्त झाला होता, पण त्याचे तेज अजूनही आकाशात आपली उपस्तिथी राखून होते. धरती त्या मंद प्रकाशात अंधारकडे जात होती. समुद्रालाही आता चेव चढला होता. त्यानेही भगवा पेठा परिधान केला होता. लाटांचेही थिरकने ढोलपथकाच्या लहरीने अधिक थैथयू लागले होते. ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपले भान विसरून सारेच त्या जल्लोषात मंत्रमुग्ध झाले होते. शिवगर्जनांनी आसमंत प्रफुल्लित झाला होता. सागरातून येणाऱ्या गार हवेत मशालही आपली जीभ लपलपवत होती.
        किल्ल्याच्या बाहेरील भव्य पटांगणात मिरवणूक येऊन ठेपली. पटांगणात शिवरायांची भव्य रांगोळी साकारण्यात आली होती.
निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू
अखंड स्तिथीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी ।।
        शिवगर्जना, आई भवानीचा उदे करून सारेच भव्य अश्या प्रवेशद्वारातून आठच्या सुमारास आत प्रवेशले. चारही बाजुंनी किल्ल्यावर प्रतापगडावरील आलेल्या मशाली सज्ज होत्या. त्या प्रज्वलित करण्यासाठी मावळेही सुसज्ज होते. महाराजांना मानवंदना दिली
गेली. विधिवत त्यांचं पूजन केलं गेलं, आई भवानीच्या मंदिरातून आणलेल्या मशालीचं पूजन करून, किल्ल्यावरच्या मशाली प्रज्वलित करण्यासाठी ती पुढे सरसावली...एकच जल्लोष झाला, शिवागर्जनांनी किल्ला आणि
आसमंत दणाणून निघाला... ढोलपथकाचा पारा सर्वोच्च शिखरावर गेला... त्या गर्जनेतच एक एक करून साऱ्याच मशाली प्रज्वलित झाल्या.. किल्याच्या सभोवती वर केशरी ज्वाळांच्या लपट्या, शिवतेजाचे गुण गौरवू लागल्या. आसमंत उजळून निघाला. मशालीच्या रोषणाईचा प्रकाश किल्ल्याबाहेर ओसंडून वाहू लागला. फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंतात नवीन नक्षत्रांचा पाऊस पडू लागला...ते दृश्य पाहून उपस्तीथांच्या डोळ्यांचे
पारणे फिटले..
साऱ्यांच्या चेहऱ्यावर असीम तृप्तीचे भाव उमटले होते. हाती घेतलेलं शिवकार्य सुव्यवस्थेत पार पडल्याने सारे वातावरण हर्षमय होते. साऱ्यांनीच हा आनंद असाच अखंडित वाटला जाईल असा दृढनिश्चय केला आणि रात्री नऊ वाजता कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ते सारे चित्रन पाहून मनाला उभारी आली खरी पण आपण बरंच काही गमावल्याची झुळूक बाहेरच सोडून विमानतळाच्या आता प्रवेश केला आणि सिंगापूर एअरलाईन्स कडे रिकाम्या जागा भरत रवाना झालो.

|| जय शिवराय ||
◆◆◆नितेश पाटील,धनसार,पालघर ९६३७१३८०३१◆◆◆Email :- nitesh715@gmail.com

देवरूपा ट्रेक

ट्रेक देवरूपा हिमालय महात्म्यांचा सहवास मोठा दिव्य प्रत्यय घेऊया उंचावरती घर हिमाचे जाऊन तेथे पाहूया फुलझाडांच्या दऱ्यांमधून बहरलेल्...